जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
बांधकाम विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम कार्यकारी अभियंता (बांधकाम)
विभाग प्रमुखाचे नाव श्री धनंजय बरडे (प्रभारी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2435340
विभागाचा ईमेल eeworkzp@rediffmail.com

बांधकाम विभाग हा जि.प. अंतर्गत रस्ते, इमारती यांची बांधकामे तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती त्यासंबंधी कार्यवाही करणे, यांमध्ये शासकीय इमारती व रस्ते यांचा वार्षिक आराखडा तयार करून त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे. मुख्यत: स्थानिक विकास कार्यक्रम,वैधानिक विकास मंडळ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अर्थ संकल्पीय कामे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जि.प. अंतर्गत इतर विभागाकडून बांधकामा संबंधीच्या योजनांची अंमलबजावणी करणेची कार्यवाही हा विभाग करतो.
 
या विभागांतर्गत अकोट, बाळापुर,मुर्तिजापुर असे तीन उपविभाग कार्यरत आहेत. या उपविभागामार्फत तालुका स्तरावर इमारती व रस्ते विषयक बांधकामांची अंमलबजावणी केल्या जाते.
 
संरचना
या विभागांतर्गत अकोट, बाळापुर,मुर्तिजापुर असे एकुण 3 उपविभाग कार्यरत असुन बांधकाम विभागामध्ये खालीलप्रमाणे संवर्ग कार्यरत आहेत. अंतर्गत आस्थापना
 
अक्र
संवर्ग
मंजुर पदे
1 कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता 33
2 कनिष्ठ अभियंता यांचे सहाययक/स्थापत्य अ स 07
3 मुख्य आरेखक 01
4 आरेखक 03
5 कनिष्ठ आरेखक 09
6 अनुरेखक 23
7 मिस्त्री ग्रेड.1 07
8 मिस्त्री ग्रेड.2 ..
9 वरिष्ठ यांत्रिकी 01
10 कनिष्ठ यांत्रिकी 01
11 तारतंत्री 01
12 जोडारी 01