जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला इतिहास
भारतात फार प्राचीन काळापासुन म्हणजे मौर्य, गुप्त इत्यादींच्या काळातही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या व खेडे हा स्थानिक कारभारातील प्रमुख घटक होता. चोल राजांनी तर स्थानिक स्वराज्य संस्थाना विशेष उत्तेजन दिले होते. मनुस्मृती नारदस्मृती मध्ये ग्रामस्तरावर कार्य कराणा-या ग्रामपंचायतीसदृष 'न्यायपंचायत' या संस्थेचा उल्लेख आहे तर, इ.स. पूर्व तिस-या शतकात भारतात आलेल्या मॅगेस्थिनीसने केलेल्या लिखाणात नगर प्रशासनाचे वर्णन आले आहे.
 
भारताच्या आधुनिक इतिहासात लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेबाबत केलेले प्रयत्न व त्याने संमत केलेला इ.स.1882चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लक्षात घेता लॉर्ड रिपन यास यथार्थतेने 'स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक' असे म्हटले जाते.
 
स्वातंत्रयोतर काळात पंचायतराज व्यवस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती शासनाने1957मध्ये बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. मेहता समितीने आपला अहवाल1958मध्ये सादर केला. या समितीने लोकशाहीच्या विकेंद्रिकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. ग्रामीण स्थानिक संस्थांच्या या त्रिस्तरीय रचनेसच 'पंचायतराज' असे संबोधले जाते.
 
बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पध्दती महाराष्ट््रात कशा प्रकारे सुरू करता येईल किंवा लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाची मेहता समितीची संकल्पना महाराष्टात कशा प्राकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा संखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट राज्याचे त्यावेळचे महसूल मंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली1960मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने1961मध्ये आपला अहवाल सादर केला. या सपितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम1961संमत करण्यात आला व दिनांक1मे1962पासुन पंचायतराज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पध्दती स्विकारण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे तीन स्तर खालील प्रमाणे—
 
  • ग्राम पातळी ..... ग्रामपंचायत
  • तालुका पातळी ..... पंचायत समिती
  • जिल्हा पातळी ..... जिल्हा परिषद
 
अध्यक्ष व त्यांचे कार्यकाल
मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे कार्यकाल
अध्यक्षांचे नांव
कार्यकाल
श्री नि. श्री. सपकाळ 12 08 1962 ते 17 01 1967
श्री गो. शे. सरनायक 12 08 1967 ते 15 03 1972
श्री के. ना. धाबेकर 12 08 1972 ते 19 06 1979
श्री गो. जे. खोटरे 20 06 1979 ते 14 03 1985
श्री के. ना. धाबेकर 20 05 1985 ते 30 06 1990
प्रशासक मु. का. अ. 01 07 1990 ते 20 03 1992
श्री कि. कु. गवळी 21 03 1992 ते 28 06 1996
श्री र. ना. बकाल प्रभारी 29 06 1996 ते 28 09 1996
श्री कि. कु. गवळी 27 09 1996 ते 20 03 1997
सौ.शोभाताई आ. गावंडे 21 03 1998 ते 20 03 1998
श्री मु. सं. मेडशीकर 21 03 1998 ते 30 06 1998
प्रशासक मु. का. अ. 01 07 1998 ते 30 12 1998
डॉ. द. मो. भांडे 30 12 1998 ते 24 10 1999
श्री शिवाजीराव देशमुख प्रभारी 25 10 1999 ते 29 12 1999
श्री वि. ना. मते 30 12 1999 ते 29 12 2001
श्री ब. भ. सिरस्कार 30 12 2001 ते 30 12 2003
श्री श्रावण शे. इंगळे 31 12 2003 ते.29 06 2006
श्री. बालमूंकूदजी पांडूरंग भिरड 30 06 2006 ते 29 12 2008
मा. सौ सविया अप्पुन नसीम 30 12 2008 ते 29 06 2011
मा. सौ पूष्पाताई महादेवराव इंगळे 30 06 2011 ते 29 12 2013
मा. श्री.शरद नामदेवराव गवई 30 12 2013 ते .......
मा.सौ. संध्याताई हरिदास वाघोडे  
मा. सौ. प्रतिभाताई भोजने 17 01 2020 ते ......
   
   
   
   
   
   
   
   
अधिकारी
कार्यकाल
श्री जे. वाय. देशमुख 01 05 1962 ते 15 05 1965
श्री के. एन. होले 01 06 1965 ते 17 12 1966
श्री व्ही. एस. गोपालकृष्ण 30 01 1967 ते 31 03 1969
श्री एच. ए. सवैन 26 04 1969 ते 21 08 1971
श्री बी. के. अगवाल 21 08 1971 ते 06 04 1973
श्री डि. वाय. मोपकर 25 06 1973 ते 08 06 1976
श्री जॉनी जोसेफ 08 06 1976 ते 26 12 1978
श्री एस. सी. कोठारी 26 12 1978 ते 05 05 1981
श्री आर. जी. बनसोड 05 05 1981 ते 06 08 1983
श्री गोरख मेघ 15 03 1983 ते 17 06 1985
श्री एम. बी. अप्पलवार 25 06 1985 ते 15 06 1988
श्री एम. बी. रे 20 06 1988 ते 06 07 1991
श्री व्ही. जी. खेडकर 18 07 1991 ते 31 08 1991
श्री एन. जे. रामटेके 20 11 1991 ते 06 01 1994
श्री अमिताभ जोशी (भा.प्र.से.) 01 02 1994 ते 26 03 1996
श्री ओमप्रकाश गुप्ता (भा.प्र.से.) 29 03 1996 ते 20 04 1998
श्रीमती सीमा व्यास (भा.प्र.से.) 22 05 1998 ते 18 06 2002
श्री जयंत गायकवाड (भा.प्र.से.) 26 06 2002 ते 10 03 2003
श्री सौरभ विजय (भा.प्र.से.) 11 03 2003 ते 24 06 2004
श्री एस. जी. वाघमारे प्रभारी 25 06 2004 ते 14 09 2004
श्री बी. आर. पोखरकर (भा.प्र.से.) 15 09 2004 ते 27 01 2006
श्री. एस. जी. माळाकोळीकर (भा.प्र.से.) 07 04 2007 ते 07 01 2008
श्री. नितीनकूमार खाडे (भा.प्र.से.) 01 04 2008 ते 07 02 2009
डॉ अश्विनी जोशी (भा.प्र.से.) 15 06 2009 ते 05 08 2010
श्री मुथ्थुकृष्णन संकरनारायणन (भा.प्र.से.) प्रभारी 05 08 2010 ते 07 09 2010
श्री ए. जी. वाजे प्रभारी 07 09 2010 ते 07 03 2011
श्री ई.रविंद्रन (भा.प्र.से.) 07 03 2011 ते 03 07 2012
श्री अशोक शुक्ला (भा.प्र.से.) प्रभारी 03 07 2012 ते 31 08 2012
श्री ए.बी.उन्हाळे (भा.प्र.से.) 31 08 2012 ते 15 01 2015
श्री एम देवेंदर सिंह (भा.प्र.से.) 16 01 2015 ते 03 02 2016
श्री.अरुण विधळे (भा.प्र.से.) 16 02 2016 ते 24/04/2017
श्री.एस. रामामुर्ती (भा.प्र.से.) 09 06 2017 ते 19 04 2018
श्री.कैलास सुखदेव पगारे (भा.प्र.से.) 10 05 2018 ते 05 02 2019
श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) 20/02/2019 ते 24/01/2020
श्री. सौरभ कटियार (भा.प्र.से.) 22/07/2020 ते ...