मा.मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हा परिषद अकोला |
बी. वैष्णवी (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला दुरध्वनी क्र- 0724 2435213
|
मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासन यंत्रणेतील केंद्र बिंन्दु आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीहयांना एका बाजुला नियुक्त प्रतिनिधी यांच्या मध्ये योग्य व सतत संपर्कसाधुन सुंसंवाद व सहयोग निर्माण करण्याचे प्रमुख कार्य करावे लागते. कर्मचारी वृंदाना कामकाजा बाबत त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचे ठिकाणी शिस्त व कर्तव्य तत्परता निर्माण करावयाची आहे. ही यंत्रणा जनतेच्या अडचणी सहानुभुतीने दुर करु शकतील असा जनतेत विश्वास निर्माण करण्याच्या दृष्ट्रीने राबवयाची असते. प्रशासन यंत्रणा कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने करण्यात येणा-या विधायक सुचनांचा स्विकार त्यांनी करावयाचा असतो. लोकनियुक्त प्रतिनिधींना त्यांच्या अपेक्षित कार्यवाही संबंधी कायदे विषयक निर्णय अधिनियमाचे अधिनिस्थ राहुन नियमाने अर्थाची उकल करुन कोणत्याहीप्रकारे भीड न बागळता सल्लादेणे हे त्यांचे कार्य आहे. जिल्हा परिषद प्रशासनातील अडचणी किंवा विकासाच्या दृष्टीने कोणतीही माहीती त्यांनी विभागीय आयुक्त किंवा शासनाकडे सादर करावयाची असते. आणि शासना चे महत्वाचे निर्णय व धोरण हे जिल्हापरिषदेलाही योग्य त-हेने समजुन सांगवयाचे असते. थोडक्यात मुख्य कार्यकारी अधिकारीयांनी शासन, जिल्हा परिषदव कर्मचारीवृंद यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद अथवा संघर्ष होवु न देता साधकाचे, संयोजकाचे कामकरावयाचे असते. कामाची क्षमता व सचोटी तसेच चातुर्य,सहानुभुतीपुर्वक दृष्टीकोण व लोकशाही यंत्रणेतील स्वाभाविक वृत्ती साठी समन्वय साधुन मनोवृत्तीची विविध क्षेत्रातील कार्य करतांना एक्य व ते टिकवीण्यासाठी क्षमता त्यांचे जवळ असावी लागते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद प्रमुख असुन त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 85 मध्ये निर्देशित केलेली पुढील कामे करावयाची असतात.
- नियमानुसार जिल्हा परिषदेच्या यंत्रणे कडुन कामकाज करुन घेणे.
- जिल्हा परिषदेच्या सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण करुन त्यावर नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परिषदेच्या विकासाची व योजनेची सर्व काम शिघ्र गतिने होण्या साठी उपाययोजना करणे.
- सेवा योजन कार्यालया कडुन प्राप्त माहिती नुसार जि.प. वर्ग 4 च्या कर्मचा-यांना नियुक्त करणे.
- कर्मचारी वृंदात शिस्त राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे.
- त्यांना प्रदान केलेल्या अधिकारा नुसार कामे व योजना मंजुर करणे
- दिलेल्या अधिकारानुसार निविदा करार मंजुर करणे.
- जिल्हा परिषदेच्यावतीने कराची अंमलबजावणी करणे.
- दिलेल्या अधिकारात स्थावर व जंगम मालमत्तेची विल्हेवाट लावणे बाबत कार्यवाही करणे.
- निरनिराळया खातेप्रमुखांना नियमाला धरुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य या
- बाबत सक्ती प्रदान करणे. वर्ग-1 व वर्ग-2 चे जिल्हा परिषद राजपत्रित अधिका-याचे गोपनीय अहवाल लिहणे.
- जिल्हा निधीतुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या सल्याने रक्कमा काढणे व त्यांचे वितरण करणे.