जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
समाज कल्याण विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम समाज कल्याण अधिकारी
विभाग प्रमुखाचे नाव श्री हरीनारायणसिंह ज.परिहार (प्र.)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2435779
विभागाचा ईमेल dswozp.akl@gmail.com

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास आराखडा सन २०१८-१९ ते २०२२-२३

== अकोला == अकोट == बाळापूर == बार्शीटाकळी == मूर्तिजापूर == पातूर == तेल्हारा ==

 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा विकास करणे या यॊजनॆ अंतर्गत बृहत आराखडा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला सन २०२३-२४ ते २०२७-२८

== अकोला == अकोट == बाळापूर == बार्शीटाकळी == मूर्तिजापूर == पातूर == तेल्हारा ==

 

 


समाज कल्याण विभागाची निर्मिती शिक्षण व समाज कल्याण विभागाची विभागणी होउन माहे मार्च 1972 मध्ये झाली. सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना क्रमांक आरओबी-1083.43.18;ओ एन्ड एमध्द दिनांक 22 एप्रिल 1943 नुसार समाज कल्याण,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाची दिनांक 1 मे 1983 पासुन विभागणी करण्यात आली असून आदिवासी विभागा संबंधीचे विषय नवनिर्मित आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले व या विभागाचे नांव समाज कल्याण,सांस्कृतीक कार्य व क्रीडा व पर्यटन विभाग असे होते तदनंतर शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र.आरवोबी-1093.280 सिआर-18.93.18 रवका दिनांक 27 एप्रिल 1993 अन्वये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आर वोवी/1093/सीआर-66.93.18 रवका दिनांक 24 जुन 1993 अन्वये महिला व बाल कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण्ा विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, व ईतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण या स्वतंत्र विभागाची दि.10 मार्च 1999 पासुन स्थापना केली.
 
कार्यालयीन कर्मचारी :-
अधिक्षक - 1 वैसाका - 1. सकनि - 7 व.सहायक- 2 क.सहा. 1. वाहन चालक 1 शिपाई - 3
कार्यालयाचे अंतर्गत आस्थापना
संवर्ग मंजुर पदे
समाज कल्याण अधिकारी 1
व्यसन मुक्ती अधिकारी 1
अधिक्षक 1
वैद्यक़िय सामाजिक कार्यकर्ता 1
वरिष्ठ सहा. 2
कनिष्ठ सहा. 1
समाज कल्याण निरीक्षक 5
परिचर 4
चौकीदार 3
सफाई कामगार 3
कनिष्ठ काळजी वाहक 3
विषेश शिक्षक 6
व्यवसाय शिक्षक 3
एकुण 34