जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध विभाग
शिक्षण विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती वैशाली ठग
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724 - 2435313
विभागाचा ईमेल mdmaakola25@gmail.com

शिक्षण विभाग जि.प.अकोला या विभागाकडे सर्व जिल्हातील प्राथमिक, माध्यमिक, शाळातील शिक्षकांचे प्रशासनाची जबाबदारी असुन, त्याच प्रमाणे पर्यवेक्षण, नियंत्रण व मुल्यमापनाची ही जबाबदारी पर्यवेक्षकीय यंत्रणेकडे आहे. जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा हया विभागाकडे आहे.
 
जिल्हयातील प्रत्येक गांवांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असुन त्याकरिता शिक्षण विभाग वचनबध्द आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलं शाळेत दाखल करून घेण्यासाठी, सर्व शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत. हे अभिप्रेत असुन गांव पातळीवरील ग्राम शिक्षण समितीच्या सहकार्याने हे मोलाचे काम केले जाते.
 
या विभागामार्फत विद्यार्थ्याच्या कल्याणाकरिता अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये जिल्हा क्रिडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, गणवेष व लेखन साहित्य, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, इत्यादी. जे विद्यार्थ्यी नियमित शाळेत दाखल होण्यास असमर्थ आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता महात्मा फुले शिक्षण हमी योजना, वस्ती शाळा इ. वैशिष्टय पुर्ण व नाविन्य पुर्ण पर्यायी शिक्षणाची व्यवस्था या विभागा मार्फत करण्यात येते.
 
शालेय व्यवस्थापना मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी 'सर्व शिक्षण मोहिम' हि योजना या विभागाकडुन राबविल्या जात असुन सन 2020 पर्यत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच इ.स.2020 पर्यत सर्व मूला मुलींना टिकवून ठेवणे हे या योजनेचे प्रमुख धेय आहे.
कार्यालयीन कर्मच्या-यांची स्थिती
अ.क्र
पदनाम
मंजुर पदे
1 शिक्षणधिकारी प्राथमिक 1
2 उपशिक्षणधिकारी प्राथमिक 2
3 अधिक्षक वर्ग-2 1
4 क. ले. अ. 1
5 कक्ष अधिकारी 1
6 अधिक्षक 1
7 लघुलेखक 2
8 वरिष्ठ सहाययक 3
9 कनिष्ठ सहाययक 7
10 वाहन चालक 2
11 परिचर 3

अंतर्गत आस्थापना
अ.क्र पदनाम मंजुर पदे
1 शिक्षण विस्तार अधिकारी - वरिष्ठ 9
2 शिक्षण विस्तार अधिकारी - कनिष्ठ 15
3 केंद्र प्रमुख 85
4 शिक्षक 4005