ई-गव्हर्नंसच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कार्यालयीन स्तरावर विविध उपाय योजना केल्या असून मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्ष निर्माण करण्यात आला आहे. जिल्हा परिषद जिल्हास्तरीय सर्व विभाग / उपविभाग तसेच सर्व पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांना कार्यालयात संगणक उपलब्ध असून सर्व प्रकारची टिपणी लेखन, पत्रव्यवहार हे संगणकीय टंकलेखानाद्वारेच करण्यात येते. शासनाच्या ई-गव्हर्नंस धोरणानुसार कार्यालयात खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
जि. प. चे संकेतस्थळ- जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://akolazp.gov.in हे आहे. ई-गव्हर्नंस धोरणानुसार gov.in चे डोमेन नेम NIC कडून प्राप्त करण्यात आले आहे. जि. प. चे अधिकाऱ्यांसाठी @gov.in चे ई-मेल प्राप्त करून घेणेची प्रक्रिया सुरु असून लवकरच @gov.in चे ई-मेल वापरात येतील.
लॅन- अकोला जिल्हा परिषद मुख्यालायातील सर्व संगणक लॅनव्दारे जोडले असून सर्व संगणकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणेत आली आहे.
अतिजलद फायबर इंटरनेट व ब्रॉडबँड इंटरनेट - जिल्हा मुख्यालय येथे अतिजलद फायबर इंटरनेट व ब्रॉडबँड इंटरनेट तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन ने जोडले असून त्याव्दारे ई-मेल, बीडीएस इत्यादी साठी वापर केला जातो. सध्या वाय-फाय प्रणाली उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरु आहे.
बायोमेट्रीक प्रणाली - कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा परिषद, अकोला येथे आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, आरोग्य केंद्र, उपविभाग ई. मह्त्वाच्या सर्व ठिकाणी बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्यांना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचार्याच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.
व्हिडियो कॉन्फरसिंग - जिल्हा परिषद अकोला येथे स्वतंत्र व्हिडियो कॉन्फरसिंग कक्षाची स्थापना करण्यात आली असुन जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी त्याद्वारे शासनाशी थेट सम्पर्कात असतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला हे कामांचा आढावा नियमीतपणे घेत आहेत. तसेच कोव्हिड-१९ च्या बाबत शासनाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या आढावा सभा या googlemeet, Zoom meeting app, Microsoft teams ई. च्या मध्यामतूOnline घेण्यात येत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे - जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर व टीव्हिवर होते.
युनिकोड फॉन्ट: एम. एस. वर्ड, एम. एस. एक्सेल, इ. फाईलवर जि. प. चे कार्यालयातील कोणत्याही संगणकावर काम करता येणेसाठी युनिकोड फॉन्ट वापरणेवर भर देण्यात येत आहे. युनिकोड फॉन्ट साठी आधुनिक softwares जसे गुगल इनपुट टूल्स, ism v6, ई. softwares संगणकांवर स्थापित करण्यात आले आहे. |