बंद

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

    • तारीख : 15/02/2025 -

    तपशिल

    इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विजाभज विमाप्र) मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णय दि. 12 जानेवारी 1996 व दि. 25 जुलै 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

    1. विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.
    2. विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्यापेक्षा जास्त असावी.
    3. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट नाही.
    4. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शाळेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतात.

    लाभार्थी:

    इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.60/- प्रमाणे एकुण 10 महिन्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.100/- प्रमाणे एकुण 10 महिन्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.