जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळाला मी नियमित भेट देत आलो असून सदर संकेतस्थळावर अंत्यंत उपयोगी व महत्वपूर्ण माहिती विशेष करून जिल्हा परिषद, राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांची मिळत राहते. आता सदर संकेतस्थळ नव्या रुपात आलेले असून माहितीचे फार चागले सादरीकरण करण्यात आलेले आहे. प्रशासनाच्या चांगल्या प्रयोगास हार्दिक शुभेच्छा.
जिल्हा परिषद अकोला अंतर्गत चालणा-या विविध योजना, कार्यक्रम, सेवांची माहिती सरसामान्य नागरिक व संबधितांना त्वरित पुरविण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने अद्यावत संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे, याचा जनतेला नक्कीच उपयोग होईल.
जिल्हा परिषद अंतर्गत होणारे कार्य, पुरविण्यात येणाऱ्या सेवा व योजना अधिक पारदर्शक व कार्यक्षमतेने होण्याच्या दृष्टीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ज्ञान मंडळ, पुणे व जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संगणक प्रणाली तयार करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.