मातृत्व अनुदान योजना
- शासन निर्णय, क्रमांक, दिनांक: टिएसपी/१०९५/प्र.क्र.६/कार्यासन-६ दि. २२ जून १९९५
- योजना कधीपासून राबविली जाते: १ मे १९९५ पासून
- योजनेची व्याप्ती: ही योजना महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये राबविण्यात येईल. यामध्ये अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा क्षेत्राचा समावेश आहे.
- लाभार्थी निवडीचे निकष/नियम व अठी:
- लाभार्थी हा नवसंजीवनी योजने अंतर्गत गावातील असावा.
- सदर माता ही आदिवासी एस.टी संवर्गातील असावी.
- सदर मातेला दोन जीवंत अपत्य व सध्या गरोदर असे तीन अपत्य असावे.
- प्रसुती संस्थेत होणे आवश्यक.
- योजनेचे स्वरूप: नवसंजीवनी योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या घटक योजना पुढील प्रमाणे आहेत:
- प्राथमिक आरोग्य सेवा पुरविणे.
- पोषण विषय कार्यक्रम.
- लाभाचे स्वरूप: गरोदर मातेला संस्थेत प्रसुती झाल्या नंतर ७ दिवसाचे आत रोखीने रु. ४००/- व औषधी स्वरूपात ४००/- असे एकूण रु. ८००/- चे अनुदान वाटप करण्यात येते.
- अर्ज कोठे करावा: प्रा.आ.कें./ उपकेंद्र
- अर्ज नमूना कोठे मिळणार: संस्थेतील आरोग्य सेविका
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.