बंद

    बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना :

    • तारीख : 14/02/2025 -

    तपशिल

    योजनेचे उद्दीष्ट

    जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावणे व त्यांना
    स्वयंपूर्ण करणे.

    अनुदेय लाभ

    बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत/क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थ्यास खालीलपैकी एकाच घटकाचा लाभ अनुदेय राहील:

    कृषी योजना अंतर्गत अनुदान रक्कम
    घटक अनुदान रक्कम (रु.)
    नवीन विहीर 4,00,000/-
    जुनी विहीर दुरुस्ती 1,00,000/-
    शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण 2,00,000/-
    पंपसंचासाठी वीज जोडणी आकार 20,000/-
    ठिबक सिंचन संच 97,000/-
    तुषार सिंचन संच 47,000/-
    पंपसंच (डिझेल/विद्युत) 40,000/-
    पीव्हीसी पाईप 50,000/-
    परसबाग 5,000/-

    लाभार्थी निवड निकष

    1. लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे.
    2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
    3. शेतकऱ्यांचे नावे जमिन धारणेचा 7/12 दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
    4. लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते असावे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
    5. नवीन विहीरींसाठी किमान 0.40 हेक्टर व नवीन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
    6. योजनेतंर्गत सर्व घटकांसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर शेतजमिन राहील.
    7. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा लाभ देय राहील.

    योजनेचा लाभ घेण्यास

    योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे.
    या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.
    सदर योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या संबंधित पंचायत समितीतील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.