बंद

    अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायात गुंतलेल्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.

    • तारीख : 15/02/2025 -

    अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिंच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

    1. कोणत्याही श्रेणीतील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
    2. उत्पन्न मर्यादा नाही.
    3. पालकांनी अस्वच्छ व्यवसायात गुंतलेले असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे:
      • अस्वच्छ व्यवसायाचे पालकाचे प्रमाणपत्र
      • हमीपत्र
    4. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शाळेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतात.

    लाभार्थी:

    इयत्ता 1 ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रू.350/- प्रमाणे एकुण 10 महिन्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    कोणत्याही श्रेणीतील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.