भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील विदर्भ प्रदेशात हा जिल्हा आहे. कृषि हवामान शास्त्राच्या दृष्टिकोनातुन विदर्भाचे पर्जन्यमाना नुसार चार भाग पडतात. निश्चित पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, मध्यम ते जास्त पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश. यामध्ये संपुर्ण अकोला जिल्हयाचा निश्चित पावसाचे प्रदेशामध्ये मोडतो. जिल्हा परिषद मधील हा विभाग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी. या दृष्टिने कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. व शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.
कृषी विभाग
कृषी विभाग हा अमरावती जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे. कृषी विकास अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख असतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजना राबविल्या जातात.
- शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्यातून शेतकर्यांना शासनाच्या सुविधा पुरवणे.
- कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण – शेतकर्यांना शेती साठी उत्तम दर्ज्याच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात व फसवणूक होऊ नये म्हणून बियाणे, खते, किटक नाशके यांचे गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणेसाठी विभागमार्फत सनियंत्रण केले जाते.
- कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी कृषि निविष्ठाचे सनियंत्रण करणे.
- कृषी विस्तार – नविन कृषी तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करणे.
- जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेचे कामकाज पाहणे, विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे.
- कृषि विकास अधिकारी
- जिल्हा कृषि अधिकारी
- मोहिम अधिकारी
- कृषि अधिकारी
- विस्तार अधिकारी (कृषि)