बंद

    लघु पाटबंधारे विभाग

    सामान्य कार्ये:

    • जलस्रोतांचा संवर्धन आणि वापर
    • छोटे जलाशय, नद्या, ओढे यावर बंधारे बांधुन पाणी अडविणे
    • पाटबंधारे बांधकामांची देखरेख करणे
    • सिंचन सुविधा निर्माण करणे आणि पाण्याचे योग्य वितरण करणे
    • पाणी साठवण क्षमता वाढवणे

    गाव तलाव बांधणे व दुरुस्ती करणे

    • गावाच्या जवळ नाल्यावर मातीचा बांध बांधुन निर्माण केलेला जलसाठा म्हणजे गावतलाव.
    • पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे.

    सिमेंट कॉक्रिट बंधारे बांधणे/ साठवण बंधारे बांधणे

    • नदी नाल्यातील पाणी अडविणेकरिता बांधलेले संधानका म्हणजे सिंमेंट नाला बांध/ साठवण बंधारा.
    • वाहुन जाणारे पाणी अडविणे व शेत शिवारात जिरवणे.
    • या बंधाऱ्याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण करणे.

    सिंचन तलाव

    • शेती सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी पुरवठा करणे.
    • कृषी क्षेत्रातील पिकांना नियमित आणि समर्पक प्रमाणात पाणी मिळवण्यासाठी सिंचन तलाव बनवले जातात.

    कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे

    • ही पारंपारिक जलसंधारण प्रणाली विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात वापरली जाते.
    • नदीच्या, ओढ्याच्या किंवा नाल्याच्या पाण्यावर छोटे पण प्रभावी संरचनात्मक बंधारे बांधले जातात.
    • या बंधाऱ्यावर निडल्स बसविल्या जातात, ज्याद्वारे पाणी अडविणे व सोडण्याचे नियंत्रण केले जाते.

    पाझर तलाव

    • पाझर तलाव जलसंचय प्रणाली असून, जलसंपत्ती साठवण्यासाठी आणि पाणी जमीनीत जिरवुन आजुबाजुच्या विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त.
    • जिल्हा जलसंधारण अधिकार
    • उपविभागीय जलसंधारण अधिकारी
    • जलसंधारण अधिकारी