बंद

    बांधकाम विभाग

    बांधकाम विभाग हा जि.प. अंतर्गत रस्ते, इमारती यांची बांधकामे तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती त्यासंबंधी कार्यवाही करणे, यांमध्ये शासकीय इमारती व रस्ते यांचा वार्षिक आराखडा तयार करून त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे. मुख्यत: स्थानिक विकास कार्यक्रम,वैधानिक विकास मंडळ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अर्थ संकल्पीय कामे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जि.प. अंतर्गत इतर विभागाकडून बांधकामा संबंधीच्या योजनांची अंमलबजावणी करणेची कार्यवाही हा विभाग करतो. या विभागांतर्गत अकोट, बाळापुर,मुर्तिजापुर असे तीन उपविभाग कार्यरत आहेत. या उपविभागामार्फत तालुका स्तरावर इमारती व रस्ते विषयक बांधकामांची अंमलबजावणी केल्या जाते.

    व्हिजन- ग्रामीण भागातील जनतेला मुलभुत सुविधा म्हणजे रस्ते, शाळा, अंगणवाडी, आरोग्य विभागाची उत्तम दर्जाची बांधकाम हे या विभागाचे उदिष्ठ आहे.ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग ची नियमीत देखभाल, दुरुस्ती, सुधारणा झाल्यास प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होऊन मार्केटींग, आरोग्य विषय सुविधा ग्रामीण जनतेस वेगाने पुरविणे शक्य होईल अशी या विभागाची धारणा आहे.

    मिशन- ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग चे रस्ते सुस्थितीत ठेवणे हे या विभागाचे मुख्य उदिष्ठ आहे. याशिवाय ग्रामीण भागातील ब व क वर्ग दर्जाच्या तिर्थक्षेत्रच्या ठिकाणी सोयी सुविधा यांचे बांधकाम करणे हे या विभागाचे ध्येय आहे. तसेच मुळ विभागाकडुन मंजुर करण्यात आलेली शाळा /अंगणवाडी /आरोग्य /पशुवेद्यकीय विभागाची मंजुर कामांचे बांधकाम करणे हे सुद्धा या विभागाचे उदिष्ठ आहे.

    जिल्हा नियोजन व विकास समिती कडुन प्राप्त होणार्या निधीनुसार 3054(ग्रामीण मार्गाची सुधारणा), 5054( इतर जिल्हा मार्गची सुधारणा), क वर्ग तिर्थक्षेत्राची सुधारणा या योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येते.

    • कार्यकारी अभियंता
    • उपकार्यकारी अभियंता
    • शाखा/कनिष्ठ अभियंता
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
    • ड्राफ्ट्समन