बंद

    जिल्हा स्वच्छ भारतमिशन कक्ष जिल्हा परिषद अकोला

    परिचय

    पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या दि.1 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2012/प्र.क्र.72/पापु-07 नुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या नियंत्रणाखालील संपुर्ण स्वच्छता अभियान-टीएससी (निर्मल भारत अभियान-एनबीए) व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या सनियंत्रणाखालील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (डीडब्ल्यूएसएम सेल) यांचे विलीनीकरण करण्यात आले. यानुसार एकीकृत कक्षास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (जिल्हा पाणी आणि स्वच्छता अभियान कक्ष – डीडब्ल्यूएसएम कक्ष) असे नाव देण्यात आले. यानंतर पुढे या कक्षाची जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली व या कक्षाचे सनियंत्रण नव्याने पद निर्मिती करून उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांचेकडे देण्यात आले.

    या कक्षात एकुण 7 शाखा कार्यरत आहेत यामध्ये

    1. स्वच्छता शाखा
    2. पाणी गुणवत्ता शाखा
    3. माहिती शिक्षण व संवाद शाखा
    4. मनुष्यबळ विकास शाखा
    5. सनियंत्रण व मुल्यमापन शाखा
    6. वित्त शाखा
    7. आस्थापना शाखा

    या सर्व शाखांमार्फत स्वच्छता, पाणी गुणवता, पाणी बचत याबाबत प्रचार, प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

    व्हिजन आणि मिशन

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    उद्दिष्टे व कार्ये

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.
    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    प्रशासकीय सेटअप

    • मुख्य कार्यकारी अधीकारी
    • उपमुख्य कार्यकारी
    • अधीकारी (पा.व.स्व.) तथा प्रकल्प संचालक जेजेएम
    • प्रकल्प व्यवस्थापक आर्थीक वर्ग 2
    • कनीष्ठ प्रशासन अधीकारी
    • लेखाधीकारी
    • सनीयत्रण मुल्यमापन तज्ञ
    • माहीती ‍शीक्षण्‍ संवाद तज्ञ
    • माहीती ‍शीक्षण्‍ संवाद जजीमी
    • पाणी गुणवत्ता सल्लागार
    • स्वच्छता तज्ञ
    • मनुष्यविकास सल्लागार
    • कनीष्ठ सहा
    • डाटा एन्ट्री
    • शीपाई