बंद

    समाज कल्याण विभाग

    परिचय

    समाज कल्याण विभागाची निर्मिती शिक्षण व समाज कल्याण विभागाची विभागणी होउन माहे मार्च 1972 मध्ये झाली. सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना क्रमांक आरओबी-1083.43.18;ओ एन्ड एमध्द दिनांक 22 एप्रिल 1943 नुसार समाज कल्याण,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाची दिनांक 1 मे 1983 पासुन विभागणी करण्यात आली असून आदिवासी विभागा संबंधीचे विषय नवनिर्मित आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले व या विभागाचे नांव समाज कल्याण,सांस्कृतीक कार्य व क्रीडा व पर्यटन विभाग असे होते तदनंतर शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र.आरवोबी-1093.280 सिआर-18.93.18 रवका दिनांक 27 एप्रिल 1993 अन्वये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आर वोवी/1093/सीआर-66.93.18 रवका दिनांक 24 जुन 1993 अन्वये महिला व बाल कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण्ा विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, व ईतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण या स्वतंत्र विभागाची दि.10 मार्च 1999 पासुन स्थापना केली.

    व्हिजन आणि मिशन

    समाज कल्याण विभाग हा अकोला जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर निधीतून मागासवर्गीय आणि अपंग व्यक्तींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी, मॅट्रकपुर्व शिष्यवृत्ती, अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास योजना राबविल्या जातात.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर

    1. जिल्हा परिषद उपकर निधीतून मागासवर्गीय आणि अपंग व्यक्तींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
    2. अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे.
    3. दिव्यांग अव्यंग विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान.
    4. आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान.
    5. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती प्रदान करणे.
    6. दिव्यांगांच्या विविध योजना राबविणे.
    7. दिव्यांगांच्या विशेष शाळांना अनुदान देणे.
    8. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभेचे कामकाज पाहणे
    9. विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे

    प्रशासकिय सेटअप

    • जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    • समाज कल्याण निरीक्षक
    • वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता