बंद

    वित्त विभाग

    जिल्हा परिषद अंतर्गत हा अत्यंत महत्वाचा विभाग असून जिल्हा परिषदेच्या कारभारावर वित्तीय नियंत्रण हा विभाग करतो. जि.प.कडील प्रत्यक्ष जमा व खर्च यांचे हिशेब ठेवणे, तसेच जि.प.कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवणे, जि.प.कर्मचा-यांची सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे तसेच जि.प.चे स्वत:चे उत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच वित्तीय औचित्याचे पालन करणे संबंधी सर्व विभागांना मार्गदर्शन करणे. विभागाचे प्रमुख असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या सर्व बाबींवर प्रामुख्याने नियंत्रण ठेवतात.

    जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्नाचे अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी या विभागावर असल्यामुळे, जि.प.चे जमा व खर्चावर नियंत्रण हा विभाग ठेवतो.

    1. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांचे नियंत्रण करणे.
    2. जिल्हा परिषदाचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.
    1. मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांना वित्‍तीय सल्‍ला देणे.
    2. विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपुर्व पडताळणी, तपासणी व लेखा परिक्षण करणे.
    3. जिल्हा परिषद लेख्यांचे संकलन करणे.
    4. जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखा परिक्षण करणे.
    5. जिल्हा परिषद सर्व आर्थिक व्यवहारासंदर्भात अंमलात आलेल्या नियम व आदेशाचे पालन केले आहे हे पाहणे.
    6. अनुदानाच्‍या विवरणपत्रे संकलीत करणे व शासनास सादर करणे.
    7. जि.प.गुंतवणुकीबाबत मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.
    8. भविष्‍य निर्वाह निधी संपुर्ण लेखे अद्यावत ठेवणे व प्रकरणे निकाली काढणे.
    9. निवृत्‍तीवेतन व कुटूंबनिवृत्‍ती वेतन प्रकरणे निकाली काढणे.
    10. शासकिय गटविमा अंतीम प्रकरणे निकाली काढणे.
    11. अंशदान परिभाषीत निवृत्‍तीवेतन योजना / राष्‍ट्रीय निवृत्‍तीवेतन योजना प्रकरणे निकाली काढणे.
    • मुख्य लेखा व वित्त अधिकारी
    • उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी
    • लेखाधिकारी 1
    • लेखाधिकारी 2
    • सहाय्यक लेखाधिकारी
    • कनिष्ठ लेखाधिकारी
    • वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
    • कनिष्ठ सहाय्यक (लेखा)