बंद

    पशुसवंर्धन विभाग

    पशुसवंर्धन विभागांतर्गत जिल्हयात एकुण 67 पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत आहेत. पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवून शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्याबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनु.जाती, जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.

    • पशुधनाचा शाश्वत विकास
    • पौष्टिक सुरक्षा
    • आर्थिक समृद्धी आणि उपजीविका आधारासाठी कुक्कुटपालन
    • विशिष्ट प्राण्यांच्या रोगांसाठी रोगमुक्त क्षेत्र संकल्पनेला प्रोत्साहन देणे
    • प्राण्यांच्या अनुवांशिक संसाधनांचे संवर्धन
    • स्थानिक जातींचे संवर्धन
    • पशुधनाचे संरक्षण, बळकटीकरण आणि सुधारणा
    • रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि महिला आणि इतर उपेक्षित गटांसाठी उपजीविका आधार
    • पशुधन आणि कुक्कुट उत्पादनांचे उत्पादन, उत्पादकता आणि वापर
    • जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
    • पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)
    • पशुधन विकास अधिकारी सघन कुक्कुट विकास गट
    • पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1
    • पशुधन विकास अधिकारी फिरता प.वै. द. श्रेणी-1
    • सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक श्रेणी-2