बंद

    पंचायत विभाग

    जिल्हा परिषदेचे ग्रामीण विकासाचे प्रमुख घटकामध्ये पंचायत विभागाचा समावेश होतो. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेंतर्गत गाव पातळीवर जनतेच्या अत्यंत निकट अशा ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी यांचा आस्थापना तसेच गावपातळी वरील जिल्हयाचे प्रश्न सोडविणारी आस्थापना या विभागांतर्गत कार्यरत आहे. ग्राम पंचायत मार्फत जिल्हा परीषदेच्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यात येतात. तसेच ग्रामपंचायत व पाणीपुरवठा कर वसुली बाबतसुध्दा हा विभाग नियंत्रण ठेवतो. अकोला जिल्हया मध्ये एकुण 541 ग्रामपंचायत आहेत.

    ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण 16 विभागापैंकी एक महत्वाचा विभाग आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे या विभागाचे प्रमुख असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेकडील सर्व पंचायत समिती / ग्रापंचायत स्तरावरील योजना व इतर अनुषंगिक कामे केली जातात.

    • महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयाप्रमाणे योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे.
    • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम – 1959 नुसार कार्यवाही करणे.
    • ग्रामपंचायत विभागांतर्गत असलेल्या विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या संवर्गातील कर्मचाऱ्यांची आस्थापना विषयक सर्व कामकाज.
    • ग्रामपंचायतींना शासनाकडील अनुदान वाटप करणे.
    • सरपंच / उपसरपंच / सदस्य यांचे प्रशिक्षण कार्यक्रम.
    • मुख्‍य कार्यकारी अधिकारी
    • उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
    • सहा. गटविकास अधिकारी
    • कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी
    • विस्‍तार अधिकारी सांख्‍यीकी
    • ग्रामपंचायत अधिकारी (4)
    • वरिष्‍ठ सहायक (2)
    • कनिष्‍ठ सहायक (2)
    • शिपाई (2)