बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रांणा

    शासनाचे ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अधिपत्याखाली स्वायत्त संस्था नोंदणीतंर्गत सन-1984 मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची स्थापना ग्रामीण स्तरावरील विविध योजना राबविण्यासाठी करण्यात आली आहे.

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान योजना (डब्ल्यूएसएचजी), ग्रामीण गृहनिर्माण योजना यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करते.

    प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२३-२४ या कालावधीत एकूण ४६४४० घरकुलांना घरे मिळाली आहेत आणि १००% लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यापैकी ४३८५५ घरकुल पूर्ण झाली आहेत. उर्वरित २५८५ अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, आवास प्लस फॉर्म डी अंतर्गत उर्वरित २९०६५ लाभार्थ्यांना राज्य गृहनिर्माण कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या उद्देशानुसार घरे वाटप केली जातील.