छायाचित्र दालन
अकोला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातुन दि.18.03.2025 रोजी कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे वाटप कार्यक्रम
इंडीयन ऑयल कार्पोरेशन लि.व अलिम्को मुंबई यांचे संयुक्त विद्यमानाने तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला यांचे मार्गदर्शनात समाज कल्याण विभाग जि.प.अकोला यांचे सहकार्याने अकोला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर.च्या माध्यमातुन दि.18.03.2025 रोजी कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधनांचे वाटप जि.प.आगरकर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता एकुण 341 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरीता मा.अजित कुंभार,जिल्हाधिकारी अकोला,मा.वैष्णवी बी.,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला,मा.विनय ठमके,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला,श्रीमती अनिता तेलंग,उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जि.प.अकोला, श्रीमती राजश्री कोलखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.अकोला तसेच इंडीयन ऑयल कार्पोरेशन लि. व अलिम्को मुंबई चे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अकोला येथे महिला कर्मचाऱ्यांसाठी वॉकेथॉनचे आयोजन
जागतिक महिला दिन निमित्त ७ मार्च २०२५ रोजीच्या पूर्वसंदधेला आयसीडीएस अकोला तर्फे walkathon चे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी कार्यक्रमाला मा जिल्हाधिकारी अजित कुंभार सर व जिल्हा परिषद अकोला चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम यांनी हिरवी झेंडी दिली
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गृहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
मा. ना. श्री. अॅड. आकाश पांडुरंग फुंडकर तथा पालकमंत्री अकोला यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन २०२५ गृहोत्सव सोहळा अकोला जिल्ह्यात दिनांक – २२/०२/२०२५ रोजी संपन्न होत झाला आहे.
मिनी सरस प्रदर्शनी
मिनी सरस प्रदर्शनी २०२५ विभाग उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला जिल्हा