जिल्हा परिषद,अकोला अंतर्गत सन १९९८ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागांतर्गत अकोला,मुर्तीजापूर,बर्शिटाकळी,पातुर,बाळापुर,अकोट,तेल्हारा, हे ७ उपविभाग व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व देखभाल दुरुस्ती (यांत्रिकी ) कार्यरत आहेत. सदर यंत्रणे मार्फत ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याचा विविध उपाय योजना करण्यात येतात. पाणी टंचाई निवारणार्थ उपयोजना करणे,नवीन विंधन विहीर व कृपनलिका हातपंप इत्यादी कामाची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच जिल्हा परिषद कडे हस्तांतरित झालेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा चालवण्यात येतात. ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग राज्य आणि केंद्र सरकारसोबत काम करतो.
जबाबदाऱ्या:
- स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंदाज आणि अंमलबजावणी.
- प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची देखभाल करणे.
- पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या गरजा पूर्ण करतात याची खात्री करणे.
- पाणीपुरवठा योजनांच्या प्रगतीचा अहवाल देणे.