बंद

    आरोग्य विभाग

    आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाय करणे व प्रजनन बाल आरोग्यांतर्गत स्त्री गर्भवती राहिल्यापासून मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्युपर्यंत विविध वयोगटांमध्ये 50 प्रकारच्या आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे तसेच सर्वांगीण आरोग्य पुरविण्याची उपाययोजना जनतेच्या सहभागातून करून अंमलबजावणी करणे.

    त्याप्रमाणे शासनाच्या 6 राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ऍलोपॅथिक दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने व आरोग्य पथक यांच्या सहभागाने सर्व नागरिकांना उपचारार्थ सेवा पुरविणे.

    राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत आरोग्याशी संबंधित कुटुंब कल्याण नियंत्रण, हिवताप नियंत्रण, पोलिओ, कुष्ठरोग, माता-बाल संगोपन, नेत्र तपासणी, क्षयरोग नियंत्रण, अंधत्व निवारण, एड्स जनजागृती इत्यादी सेवा आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पुरवितात.

    • ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय सेवा पुरविणे व आरोग्य विषयक योजनांचा लाभ मिळवून देणे.
    • आरोग्य संवर्गाची जिल्हा आस्थापना व आरोग्य विभागाच्या कार्यालयीन आस्थापनेवर नियंत्रण ठेवणे.
    • महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
    • जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील व क्षेत्रीय संवर्गावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
    • माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे.
    • नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे.
    • आरोग्य विभागांतर्गत योजनांचा लाभ देणे.
    • जिल्हा आरोग्य अधिकारी
    • अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
    • जिल्हा माता व बाल विकास अधिकारी
    • सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी
    • तालुका आरोग्य अधिकारी
    • वैद्यकीय अधिकारी गट-अ
    • वैद्यकीय अधिकारी गट-ब
    • प्रशासकीय अधिकारी
    • जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी
    • सांख्यिकी अधिकारी

    पुरस्कार आणि प्रशंसेसंबंधी माहिती येथे नमूद करता येईल.

    संघटनेशी संबंधित माहिती येथे नमूद करता येईल.