मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

शिक्षण विभाग प्राथमिक
शिक्षण विभाग माध्यमिक
सर्व शिक्षा अभियान


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
सर्व शिक्षा अभियान - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव शिक्षण विभाग प्राथमिक
खाते प्रमुखाचे पदनाम शिक्षणाधिकारी, प्राथमिक
खाते प्रमुखाचे नाव श्री प्रशांत दिग्रसकर
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724.2435313
 
 
शालेय व्यवस्थापनामध्ये समाजाच्या सक्रिय सहभागा द्वारे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी 'सर्व शिक्षा अभियान' हा एक प्रतिसाद आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत दाखल व्हावे. तसचे गळतीचे प्रमाण शुन्य करण्यासाठी ही योजना आहे. योजनेची खालील उदिष्टे आहे.
 
 • या योजनेद्वारे प्रत्येक 40 विद्यार्थ्यामार्ग एक प्राथमिक शाळेमध्ये किमान दोन शिक्षक आवश्यक आहेत.
 • प्रत्येक वस्तीपासुन एक किलोमिटर चे आत शाळेची सोय उपलब्ध करून देणे.
 • दोन प्राथ शाळेमध्ये एक वरिष्ठ प्राथ. शाळा.
 • पटसंख्या 40 नुसार शिक्षक व शिक्षक संख्ये नुसार वर्ग खोल्या उपलब्ध करून देणे.
 • अ.जा./अ.जमाती. च्या ई.1 ली ते 8 वी च्या मुलांना पाठयपुस्तके तसेच सर्व मुलींना पाठयपुस्तके उपलब्ध करून देणे.
 • शालेय सुविधांच्या वाढीसाठी गट साधन केंद्र व समुह साधन केद्र.
 • शालेय इमारत दुरूस्ती व देखभाल.
 • शिक्षण हमी केंद्राचे नियमित शाळेत रूपांतर किंवा निकषा प्रमाणे नविन शाळा सुरू करणे.
 • उच्च माध्यमिक शाळेसाठी अध्यापन साधनासाठी विविध योजनांमध्ये समाविष्ट न झालेल्या शाळेसाठी रू. 50000/- प्रति शाळा या दराने तरतुद.
 • प्राथ. व उच्च प्राथ. शाळेतील नादुरूस्त साधनांच्या जागी नविन उपकरण खरेदीसाठी रू.2000/- प्रतिवर्षी शाळा अनुदान.
 • शिक्षक अनुदान:-सर्व प्राथ. व उच्च प्राथ. शिक्षकांसाठी प्रत्येक वर्षी रू. 500/-.
 • शिक्षक प्रशिक्षण:- प्रत्येक वर्षी 20 दिवस सेंवा अंतर्गत प्रशिक्षणासाठी तरतुद, अप्रशिक्षीत शिक्षकांसाठी 60 दिवसाचे उदबोधन वर्ग व नवनियूक्त प्रशिक्षित शिक्षकांसाठी 30 रू. दिवसाचे उदबोधन वर्ग यासाठी तरतुद.
 • लोकप्रतिनिधीचे प्रशिक्षण:- प्रत्येक गावातील व्यकतींसाठी 'महिलांना प्राधान्य' वर्षातुन दोन दिवसांसाठी खर्च मर्यादा रू.30 प्रतिदिन.
 • विशिष्ट प्रस्तावानुसाद अपंग एकात्मीक शिक्षण योजनेकरीता प्रत्येक मुलांसाठी रू. 1200 पर्यत प्रत्येक वर्षी.
 • संशोधन, मुल्यमापन, पर्यवेक्षण आणि देखरेख:- रू. 15000/- पर्यत शाळेस प्रतिवर्षी. राष्टीय, राज्य, जिल्हा, गट आणि शाळा पातळीवर प्रतिशाळेसाठी लागु केलेल्या निधीचा खर्च करणे. देखरेख प्रवाय भत्ता आणि मानधन स्थानिक आकडकेवारी उपलब्ध करणे, संशोधन व्यक्तीचा गट तयार करणे.
 • व्यवस्थापन कार्य :- यात कार्यालयीन खर्च, तज्ञांचे मानधन, इधंन खर्च यांचा समावेय आहे. व्यवस्थापन माहिती प्रणाली, समाज मार्फत नियोजन प्रक्रिया बांधकाम, जेंडर इ. विषयातील तज्ञांना प्राधान्य.
 • मुलींच्या शिक्षणासाठी :- बालशिक्षण व संगोपन आणि अनुसुचित जाती जमातीच्या समुदायातील मुलांसाठी नवोपक्रम,संगणक शिक्षण, वरील प्रत्येक उपक्रमासाठी 15 लक्ष पर्यंत.
 • गटसाधन केंद्र/समुहसाधन केंद्र :- गट साधन केंद्र इमारती बांधकामासाठी रू.6 लक्ष खर्च मर्यादा, यमुहयसाधना केंद्र इमारत बांधकामासाठी रू. 2 लक्ष.
 • शाळा बाहय मुलांसाठी विशेष उपक्रम :- ज्या ठिकाणी शिक्षणाची साय नाही त्या ठिकाणी शिक्षण हमी केंद्र स्थापन करणे, शाळा बाहय मुलांसाठी नियमित शाळांच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतुने सेतु अभ्यास उपचारात्मक अभ्यास या द्वारे परत शाळेकडे आणण्यासाठी व्यवस्था.
 • सुक्ष्म नियोजन :- घर सर्वेक्षण अभ्यास समाजाचा सहभाग शाळा आधरीत अपक्रम, कार्यालयीन साधन सामुग्री प्रशिक्षण आणि सर्व स्तरातरील उदबोधन इ. साठी पुर्व तयारी उपक्रम.
 
वरिल प्रमाणे सर्व शिक्षा अभियान या योजनची उदिदष्टे असुन त्या अनुषंगाने अकोला जिल्हयामध्ये ही योजना प्रभाविपणे राबविली जात असुन सन 2006-07 साठी रू. 6828.42 लक्ष तरतुद करण्यात आलेली असुन त्या अनुषंगाचे कार्यवाही सुरू आहे.